Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोनाबाधितांच्या गैरसोयीसंदर्भात अक्षय मुंदडांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट

rajesh-tope

rajesh-tope

echo adrotate_group(3);

मुंबई : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी अंबाजोगाईत सर्वात मोठे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु, येथील जेवणाबाबत, स्वच्छतेबाबत रुग्णांच्या मोठ्या प्रमाणत तक्रारी होत्या. यासंदर्भात भाजप युवा नेते अक्षय मुंदडा यांनी बुधवारी (दि.16) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा केली. आरोग्यमंत्री टोपे यांनी तक्रारींची दाखल घेत तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यासोबतच सीसीसीमधील रिक्त जागा भरण्याचे आणि बीड जिल्ह्यात होम आयसोलेशनची परवानगी देण्याचेही आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.echo adrotate_group(6);

   नुकतेच अंबाजोगाई जवळील लोखंडी सावरगाव येथे राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे एक हजार खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. परंतु, खाटांच्या तुलनेत पुरेसे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपलब्ध नाहीत. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे व आहे त्या स्टाफवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. या ठिकाणी मिळणार्‍या जेवणाबाबत आणि स्वच्छतेबाबतही रुग्णांच्या असंख्य तक्रारी आहेत. निकृष्ट दर्जाचे दिले जाते, तेही वेळेवर मिळत नाही. वॉर्डात, प्रसाधनगृहात प्रचंड घाण असते, नियमित स्वच्छता केली जात नाही याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. तसेच, राज्यात सर्वत्र होम आयसोलेशनचे परवानगी दिली जाते, मात्र बीड जिल्ह्यात अशी परवानगी दिली जात नाही. आ. नमिता मुंदडा यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यानंतर युवा नेते अक्षय मुंदडा यांनी बुधवारी सकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्यासोबत रुग्णांच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जेवण आणि स्वच्छतेमध्ये तातडीने सुधारणार करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले. तसेच, लोखंडी सावरगाव येथील सीसीसीमधील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबतही सूचित केले. यामुळे वाढीव कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णांना योग्य देखभालीसह जलद उपचार मिळण्याची शक्यता उपलब्ध झाली आहे. तक्रारींची विनाविलंब दखल घेत कार्यवाहीसाठी प्रशासनाला सूचित केल्याबद्दल अक्षय मुंदडा यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.echo adrotate_group(5);

आयसोलेशनची परवानगी द्या : अक्षय मुंदडा
बीड जिल्ह्यात सध्या एकाही रुग्णाला होम आयसोलेशनची परवानगी दिली जात नाही. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाबाबत आरोग्यमंत्री टोपे यांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करून ज्यांच्या घरी विलगिकरणाची नियमानुसार सोय असेल अशा रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देण्याची कार्यवाही लवकर सुरू करण्यात येईल असे आरोग्यमंत्र्यांनी अक्षय मुंडदांना आश्वासित केले.
echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);

Exit mobile version