लोखंडी सावरगावच्या कोविड केअर सेंटरला विभागीय आयुक्तांची भेट

अंबाजोगाई कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

डॉ.अरूणा केंद्रेंसह टीमच्या कामाचे कौतूक

अंबाजोगाई : जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केेंद्रेकर हे आज (दि.4) बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी लोखंडी सावरगाव (ता.अंबाजोगाई) येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन आढावा घेतला.

  जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत असताना अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रूग्णालयाच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याच् पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केेंद्रेकर दौर्‍यावर आहेत. त्यांनी स्वा.रा.ती. रूग्णालयास जाण्यापूर्वी अचानक लोखंडी सावरगाव येथील महिला रूग्णालयातील कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी कोविड वार्डात जाऊन रूग्णांशी संवाद साधला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरूणा केंद्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांकडून आढावा घेत कामकाजाच्या अनुषंगाने सूचना केल्या. तसेच, डॉ.केंद्रे यांच्यासह टीमच्या कामाचे कौतूक केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, नोडल अधिकारी डॉ.कौस्तूभ कुलकर्णी, डॉ.इम्रान अली, डॉ.एम.पी. केंद्रे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्याची मागणी
कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटच्या तांत्रिक बाबी आयुक्तांच्या कानावर घातल्या. तसेच, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे सांगितले. याबाबत आयुक्त केंद्रेकरांनी शासनाकडे पाठपुरावा कर असे आश्वासन दिले.

स्वा.रा.ती. रूग्णालयाचा घेणार आढावा
लोखंडीसावरगाव येथील रूग्णालयानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात आयुक्त सुनील केंद्रेकर हे दाखल झाले आहेत. ते अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्याकडून आढावा घेतील. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे असणार आहेत.

Tagged