RAJENDRA MASKE

भाजपा बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंचा राजीनामा!

बीड


बीड दि. 20 : येथील पंकज मुंडे यांचे कट्टर समर्थक भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा रविवारी (दि.20) राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. राजेंद्र मस्के यांनी अचानक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने बीडच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या वेळी होत असलेल्या अन्यायामुळे हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. भाजपचा राजीनामा देऊन आता पुढे कोणत्या पक्षात जाणार किंवा अपक्ष बीड विधानसभा लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राजेंद्र मस्के यांच्या सोशल मीडयायावरील भाजपचे चिन्ह, पद हे काढण्यात आले आहे. पक्षाने अनेक नियोजनामध्ये विचारात न घेतल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे राजेंद्र मस्के यांनी दैनिक कार्यारंभशी बोलताना सांगितले. तसेच सध्या फक्त भाजपा पदाचा राजीनामा दिला असून पुढील निर्णय लवकरच घेणार असल्याचे सांगितले. मस्के हे बीड विधानसभा अपक्ष लढवणार असल्याची माहिती त्यांच्या खास सूत्रांनी दिली.

Tagged