बीड दि. 23 : वाळूचा ट्रॅक्टर चालू देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही पाच हजाराची लाच स्वीकारताना होमगार्डला रंगेहात पकडले आहे. जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक जाधवर यांनी ही कारवाई केली असून होमगार्डला ताब्यात घेण्यात आले आहे. तर लाचेची मागणी करणारा पोलीस कर्मचारी फरार आहे. याप्रकरणी दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
