13 कोटींचा अपहार, सत्यभामा बांगर अटकेत

बीड


रामकृष्ण बांगरसह 41 जणांवर गुन्हा दाखल

बीड
दि.9 ः जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांनी केलेल्या लेखापरिक्षणात रामकृष्ण बांगर हे महात्मा फुले अर्बन बँक लिमीटेडचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांची पत्नी सत्यभामा बांगर या पाटोदा तालुका दुध संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन आहेत. त्यांनी चेअरमन, संचालक, पदाधिकार्‍यांसोबत संगनमत करुन 13 कोटी 21 लाख 60 हजार 25 रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केलेला आहे. तसेच 14 संस्थेचे कोणतेही कागदपत्र न घेता, मागणी अर्ज न घेता, कोणतेही तारण न घेता बनावट कागदपत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासवत त्यांच्या नावे कर्ज दाखवून ही रक्कम स्वतः उचलून गैरव्यवहार केलेला आहे. या प्रकरणी 41 जणांवर पाटोदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून यामध्ये सत्यभामा बांगर यांना अटक केली असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

जिल्हा विशेष लेखा परिक्षक बाळासाहेब उत्तमराव भोसले यांच्या फिर्यादीवरुन रामकृष्ण मारोती बांगर, सत्यभामा रामकृष्ण बांगर यांच्यासह संदिप जगन्नाथ सानप, बाळू मच्छिंद्र पवार, भाऊसाहेब बाळासाहेब सोनसळे, तुकाराम रामा बावणे, कार्यारंभ भगवान बाबासाहेब शिंदे, श्रीरंग उत्तमराव सानप, श्रावण श्रीरंग बांगर, संजय उत्तमराव सगळे, संभाजी विठ्ठलराव मसकर, भगवान साधू पाखरे, भगवान बाजीराव सोनवणे, राजेंद्र कारभारी गवळी, नवनाथ भगवान नागरगोजे, पांडूरंग निवृत्ती मस्के, रुक्मिणी सुदाम बांगर, रफिक महोम्मद पठाण, सिताबाई अरुण जावळे, बाबासाहेब भिमराव राख, रणजीत नारायण चौरे, सुरेश दत्तात्रय पुराणिक, प्रदिप दत्तात्रय कुलकर्णी, भीमराव बाजीराव सानप, दिनकर सिताराम बांगर, शामराव यशवंत कंठाळे (मयत), विष्णू विलास थोरवे, महादेव श्रीपती बांगर, राजाभाऊ नामदेव बावणे, बाळासाहेब शामराव बांगर, लक्ष्मण श्रीहरी शिंदे, नवनाथ भगवान नागरगोजे, बाबासाहेब भगवान नागरगोजे, हनुमंत रंगनाथ भोसले, प्रभाकर प्रभात गित्ते, प्रदिप बाबुराव गिरे, रविंद्र निवृत्ती उगले, जनार्धन मारोती कटाळे, गुलानभाई मेंगडे, रामचंद्र बाजीराव रांजवण, संजय भिमराव सानप अशा 41 जणांवर कलम 420, 406, 409, 467, 468, 471, 34 प्रमाणे पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged