राज्याचे कृषिमंत्री जेव्हा स्वतः ट्रॅक्टर चालवतात…

बीड

हिंदुस्थान ट्रॅक्टर पाहून धनंजय मुंडेंना झाली वडिलांची अन बालपणाची आठवण!

बीड – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज बीड येथे राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेतील ट्रॅक्टर व अन्य औजारांच्या वितरण कार्यक्रमास आले असता, त्यांनी समोर एका लाभार्थीचे हिंदुस्थान ट्रॅक्टर पाहताच त्याचे स्टेअरिंग हाती घेतले! धनंजय मुंडे यांनी स्वत: हिंदुस्थान ट्रॅक्टर हाती घेत चालवून पाहिले. हिंदुस्थान हा ट्रॅक्टर निर्माण करण्यातील अत्यंत जुना ब्रँड म्हणून ओळखला जातो. माझे वडील स्व.पंडित अण्णा मुंडे यांनी पहिले ट्रॅक्टर माझ्या बालपणी हिंदुस्थानचे घेतले होते. त्याचबरोबर आपण सर्वात प्रथम हिंदुस्थान कम्पनीचे ट्रॅक्टर चालवायला शिकलो, असल्याची आठवणही धनंजय मुंडे यांनी सांगितली.धनंजय मुंडे यांना कायमच शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या बाबतीत कायमच ते आग्रही असतात. कृषी अभियांत्रिकीकरण योजनेतील बीड जिल्ह्यातील प्रलंबित सर्व अनुदानाचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी नुकताच मार्गी लावला आहे.