MANOJ JARANGE

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपल्या लेकारांसाठी एकदा होऊन जाऊद्या पण..

बीड

केशव कदम- बीड

दि.15 : गावागावात शांततेचे आवाहन करा, गावे जागी करा आणि साखळी उपोषण करा. आपल्या लेकरांसाठी एकदा होऊन जाऊद्या पण शांततेत. आरक्षण तर मिळणारच आहे, नाही मिळाले तर 24 नंतर काय करायचे ते तेव्हा सांगेल. फक्त शांततेत आंदोलन करा कारण शांततेत खूप ताकद आहे. यांच्या बुडाखालील सगळे कागदे काढू फक्त संयम ठेवा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.15) श्री क्षेत्र नारायण गड, श्री क्षेत्र रामगड येथे दर्शन घेत बीडमध्ये दाखल झाले. त्यांचे गावागावात जल्लोषात स्वागत केले जात आहे. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र पेंडगाव येथे हनुमानाचे दर्शन घेतले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांच्यावतीने जेसीबीने फुलांची उधळण करत भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण असते तर मराठा समाज देशात पुढे असता. आरक्षण नसल्यामुळे समाज खूप मागे आहे. कुठल्याही पक्षाचे काम करा पण अगोदर लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षण मिळवा. 24 तरखेपर्यंत आपली कसोटी आहे, मात्र आरक्षण मिळणारच आहे. ग्रामीण भागातील ओबीसी समाजालाही वाटते गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यावे. मात्र काही ओबीसी नेते त्यांना उचकवण्याचे काम करत आहे. पण मराठा समाजाने ओबीसी बांधवांच्या अंगावर जायचे नाही. शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण करायचे कारण शांततेत खूप ताकद असते असे सांगत मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात माती कालवू नये, त्यांच्या तोंडाजवळ आलेला घास त्यांना मिळवू द्या. खूप कष्टाने मराठा समाजाने हे आंदोलन उभे केलेले आहे. त्यांना आरक्षण मिळवू द्या असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.