गेवराईतील लक्ष्मी लॉजमधील कुंटनखान्याचा केला पर्दाफाश!

बीड


-महिलेसह दोघे ताब्यात; एएचटीयू कक्षाची कारवाई
बीड
दि.27 ः गेवराई शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मी लॉजमध्ये कुंटनखाना सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या (AHTU TEAM BEED) पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे (psi meena tupe) यांना मिळाली. सोमवारी (दि.27) छापा मारत मॅनेजर, लॉज मालक, महिलेला ताब्यात घेत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (gevarai laxmi lodge)

गेवराई शहरातील लक्ष्मी लॉज येथे कुंटनाखाना सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. सापळा रचत डमी ग्राहक पाठवून या कुंटनखान्याचा पर्दाफाश केला. यावेळी व्यवस्थापक कैलास सोमिनाथ भोसले (वय 29 रा.कवडगाव ता.गेवराई), लॉज मालक रामेश्वर किसनराव प्रभाळे (वय 42 रा.गेवराई), यांच्यासह महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात कलम 3, 4, 5, अनैतिक व्यापार प्रतिबंध 1956 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे, सहायक फौजदार वाळके, पोशि.सतिष बहिरवाळ, महिला पोलीस नाईक चंद्रभागा मुळे, सुरेखा उगले व चालक नरवडे यांनी केली.

Tagged