जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभेतून माघार!

बीड

बीड दि. 4 : बीड विधानसभेतून मोठी बातमी समोर येत आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेतला.

बीड विधानसभेसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांचे पुतणे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि दुसरे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष तर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार गटाकडून तर डॉक्टर योगेश शिरसागर यांनी अजित पवार गटाकडून अर्ज भरलेले आहेत. आता जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतल्याने बीड मतदार संघातील समीकरणे चांगलीच बदलली आहेत. दरम्यान या संदर्भात जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.