गृह व उर्जा खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच
प्रतिनिधी । बीड
दि.21 ः महायुती सरकारचे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (दि.21) रात्री उशीरा मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गृहखाते मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खाते असणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता.
महायुती सरकारने जाहीर केलेले खातेवाटप..
1 देवेंद्र फडणवीस- मुख्यमंत्री गृह, ऊर्जा
2 एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री, नगरविकास
3 अजित पवार – उपमुख्यमंत्री अर्थ
4 चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
5 राधाकृष्ण विखे पाटील- जलसंधारण
6 हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण
7 चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण
8 गिरीश महाजन- आपत्ती व्यवस्थापन
9 गुलाबराव पाटील – जलसंधारण
10 गणेश नाईक- वने
11 दादा भुसे- शालेय शिक्षण
12 संजय राठोड- पाणीपुरवठा
13 धनंजय मुंडे- अन्न आणि नागरीपुरवठा
14 मंगलप्रभात लोढा – कौशल्यविकास
15 उदय सामंत- उद्योगमंत्री
16 जयकुमार रावल- राजशिष्टाचार
17 पंकजा मुंडे- पर्यावरण
18 अतुल सावे- ओबीसी
19 अशोक उईके- आदिवासी विकास
20 शंभुराज देसाई- पर्यटन
21 आशिष शेलार- माहितीआणि तंत्रज्ञान
22 दत्तात्रय भरणे- क्रीडा
23 आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण
24 शिवेंद्रसिंह राजे भोसले- सार्वजनिक विकास
25 माणिकराव कोकाटे- कृषिमंत्री
26 जयकुमार गोरे – ग्रामीण विकास
27 नरहरी झिरवळ- अन्न व औषध प्रशासन
28 संजय सावकारे- वस्त्रोद्योग
29 संजय शिरसाट- सामाजिक न्याय
30 प्रताप सरनाईक- वाहतूक
31 भरत गोगावले- रोजगार हमी
32 मकरंद पाटील-
33 नितेश राणे- मस्त्योद्योग
34 आकाश फुंडकर- कामगार मंत्री
35 बाबासाहेब पाटील- सहकार
36 प्रकाश आबिटकर- कुटुंब कल्याण आणि आरोग्य
तर राज्यमंत्री म्हणून
37 माधुरी मिसाळ -सामाजिक न्याय, वैद्यकिय शिक्षण
38 आशिष जयस्वाल – अर्थ, कृषि
39 पंकज भोयर- म्हाडा
40 मेघना बोर्डीकर- आरोग्य व पाणीपुरवठा
41 इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
42 योगेश कदम – ग्रामविकास, पंचायतराज