accident

भरधाव कंटेनरच्या धडकेत सहातरुण जागीच ठार तर एक गंभीर

बीड

गढी येथील उड्डाणपूलाजवळील दुर्दैवी घटना

प्रतिनिधी/गेवराई
दि.२७. महामार्गाच्या दुभाजकात अडकलेली गाडी काढत असताना भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. यात सहा तरुण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री गेवराई जवळील गढी येथील उड्डाणपूलावर घडली.


मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गढी येथील कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांच्या एक्सयूव्ही गाडीचा किरकोळ अपघात झाला होता. यात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे काही सहकारी सोमवारी रात्री उशिरा घटनास्थळी आले. दुभाजकात अडकलेली गाडी काढत असतानाच अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged