corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचे आकडा वाढला!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.8: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी आकडेवारी समोर आली आहे. शनिवारी (दि.8) जिल्ह्यात 26 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे चिंतेत वाढ झाली असून जिल्ह्यात कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

शनिवारी जिल्हा आरोग्य विभागास 1 हजार 737 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 26 पोझिटीव्ह आढळून आले असून 1 हजार 711 निगेटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये अंबाजोगाई- 4, आष्टी-1, बीड-10 , गेवराई-1, धारूर-2, केज- 2, माजलगाव-1, परळी-3, शिरूर-2 अशी आकडेवारी आहे. बाधितांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात खडक निर्बंध लागण्याची दाट शक्यता आहे

Tagged