परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, ‘या’ जिल्हा परिषदेमध्ये बंपर भरती

बीड

जर आपले शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये झाले असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी चालून आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही बंपर भरती प्रक्रिया आहे. या परीक्षेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवाऱ्यांना द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवारांनी निवड ही केली जाणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. सार्वजनिक आरोग्य विभागात ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 65 पदे ही भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार ठेवण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे. उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीतून केली जाईल. नोकरीचे ठिकाण हे सिंधुदुर्ग आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहवे लागेल.