आज राज्यातील या भागात उष्णतेची लाट;नागरिकांनो घराबाहेर पडू नका

न्यूज ऑफ द डे

Maharashtra Weather l गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. अशातच हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही भागांत विजांच्या गडगडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

या भागात पावसाची दाट शक्यता :

हवामान विधाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच आज ठाणे जिल्ह्यासह मुंबईत आज तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज कोकण विभागातही उन्हाच्या झळा बसणार आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील तापमानात आज वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या खात्यानुसार, कोकण विभागातील तुरळक भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.