बीडमध्ये आणखी चार पॉझिटीव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : शहरातील कोरोनाचे मीटर सुरुच आहे. रविवारी शहरात कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा आणखी छोटीराज गल्लीत चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाग्रस्त व्यक्तींमध्ये 30 वर्षीय स्त्री, 38, 27 वर्षीय पुरुष व 10 वर्षीय मुलगा अशा चौघांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांचे छोटीराज गल्लीतील अन्य आढळून आलेल्या कोरोनागग्रस्तांशी कनेक्शन असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांचे मीटर दिवसेंदिवस वाढतच चालले असून बीडकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 116 झाली असून यात 82 हून अधिक जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर आता 32 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

अंबाजोगाईचा शून्य कायम
बीडमधील एका लग्नात वधूचा भाऊ कोरोना प्रभावित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अंबाजोगाईतील 19 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येऊन सोमवारी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने अंबाजोगाईकरांचा जीव भांड्यात पडला आहे. अंबाजोगाई तालुक्याने आपला शून्य कायम राखला असून अद्याप तालुक्यात एकही कोरोना प्रभावित व्यक्ती आढळून आलेला नाही.

Tagged