ज्ञानराधाचे अध्यक्ष सुरेश कुटेना पाच दिवसाची कोठडी!

बीड


बीड दि. 17 : माजलगाव येथील गुन्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे, संचालक अशिष पाटोदेकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्यानंतर माजलगाव न्यायालयात पुन्हा हजर केल्यानंतर कुटेंची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना होम अरेस्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर रविवारी (दि.16) बीड शहर ठाण्याच्या गुन्ह्यात कुटेंना बीड येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळीही न्यायालयाने कुटेंची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. सोमवारी (दि.17) शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात कुटेना पुन्हा न्यायालयात हजर केले, यावेळी न्यायालयाने पाच दिवसाची (21 जूनपर्यंत) कोठडी सुनावली आहे.

ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे अमिष दाखवून त्यांच्या ठेवी वेळेवर परत दिल्या नाहीत. तसेच ठेवी देण्यासाठी तारीख पे तारीख देत अध्यक्ष सुरेश कुटे यांनी वेळ घेतला, मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात शिवाजीनगर, बीड शहर, माजलगाव शहर, केज आदी पोलीस ठाण्यात सुरेश कुटेंसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात झाले. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हे सर्व गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे व टिमने सुरेश कुटे, अशिष पाटोदेकर यांना पुण्यातून अटक केली. माजलगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 13 जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा वाढीव कोठडीसाठी माजलगाव येथील न्यायालयात हजर केले. यावेळी कुटेंच्या वकीलांनी न्यायालयात युक्तीवाद करत केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद केला. दरम्यान सुरेश कुटेंना होम आरेस्टचे आदेश न्यायालयाने दिले. यावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर माजलगाव न्यायालयाने सुरेश कुटेंना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले. त्यानंतर पोलीसांनी सुरेश कुटेंना बीड शहरच्या गुन्हा अटक करत बीड येथील विशेष न्यायालयासमोर रविवारी (दि.16) हजर केले, यावेळीही न्यायालयाने कुटेंची अटक बेकायदेशीर ठरवली अन् होम आरेस्ट ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर सोमवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर यांना बीड येथील विशेष न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी सुनावली आहे. (Beed Police ) The kute group