किल्ले धारूर/ सचिन थोरात
दि. 22 : धारूर शहरात धारूर माजलगाव हायवे लगत भारतीय स्टेट बँकेची शाखा कार्यान्वित आहे.याच शाखेच्या समोरील बाजूला बँकेचे एटीएम मागील अनेक वर्षापासून उभा करण्यात आलेले आहे. शनिवार रोजी पहाटेपूर्वीच सदरील एटीएम एका पिकअप च्या साह्याने चोरट्यांनी मध्यरात्रीच पळवून नेल्याची घटना घडल्याचे पहाटेच्या नंतर पोलीस आणि बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.सदरील एटीएम मध्ये 20 लाख रुपये पेक्षा अधिकची रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.मुळात धारूर शहरात दिवसेंदिवस भुरट्या आणि जबरी चोऱ्यांमध्ये वाढ होण्याचे प्रकार वाढले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे हे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि चोरट्यावर वचक बसवण्यात सपशेल अपयशी ठरल्याने या घटनांमध्ये वाढ होत आहे.
धारूर तालुक्यात भारतीय स्टेट बँकेच्या दोन शाखा कार्यान्वित आहेत पैकी एक बँक शाखा धारूर माजलगाव हायवे लगत अस्तित्वात आहे.या बँकेच्या समोर ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून एटीएम सुद्धा अस्तित्वात आहे.या एटीएम मुळे बँक कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण कमी होऊन ग्राहकांना अपेक्षित सुविधा पुरवल्या जातात.परंतु सदरील एटीएम शनिवार रोजी पहाटेच्या पूर्वी मध्यरात्री एका पिकप च्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी पळवन नेल्याची घटना घडल्याचं पहाटे नंतर बँक कर्मचारी आणि पोलिसांच्या लक्षात आले.सदरील एटीएम मध्ये 20 लाखापेक्षा अधिकची रोकड ठेवण्यात आलेली होती अशी प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर एटीएम चोरीसाठी वापरण्यात आलेले पिकप माजलगाव तालुक्यात आढळून आले आहे.परंतु एटीएम मशीन आणि रोकड मात्र आढळून आलेली नाही.धारूर तालुक्यात भूरट्या चोर्यांच जबरी चोऱ्यांमध्ये प्रमाण वाढताना दिसून येत आहे.देविदास वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून धारूर येथे कार्यरत आहेत परंतु त्यांचा कसलाच वचक आवेद्य धंदे करणारा वर आणि चोरट्यावर राहिला नसल्याने तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून गेलेली आहे.