शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिकखांडेंच्या कार्यालयाची तोडफोड!

बीड

बीड- दि. 27 : पंकजाताई मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत यावेळी आपण धोका दिल्याचे सांगत बजरंग सोनवणे यमाडत केल्याची कबुली दिली, यासह इतर चर्चेची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर आज गुरूवारी (दि.27) सायंकाळी कुंडलिक खांडे यांच्या शिवसेना कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाची माहिती घेत आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात खांडे यांनी ‘आपण फक्त आपल्या गावात पंकजा मुंडेंना लीड दिली, विधानसभेला ओबीसी मते मिळविण्यासाठी मला ते आवश्यक होते, पण आपण बप्पाचेच काम केले आहे. सगळी यंत्रणा त्यांना दिली आणि पैसेही पुरवले’ असे सांगताना ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात सदरचा पदाधिकारी आपण विश्वासघात केल्याचे कबुल करत आहे. तर दुसऱ्या ऑडीओ क्लीपमध्ये तो पदाधिकारी पक्षांतर करण्याची तयारी करताना देखील ऐकायला मिळत आहे. ‘ आपण आपल्या कार्यालयात लगेच शरद पवारांचा फोटो लाऊ, मी इथे नेहमी जनता दरबार भरवतो, मी थेट अंगावर जाऊ शकतो’ असे म्हटले होते. तसेच या ऑडीओ क्लीपमध्ये कथीत पदाधिकारी चक्क मंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट करित असल्याचे ऐकायला मिळत आहे. सदर ऑडीओ क्लीप मतदानाच्या अगोदरची असावी असा अंदाज असून धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगड पडले तर आपले मतदान वाढेल असे भाष्य केले होते.यानंतर आज काही वेळापूर्वी मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचे जालना रोडवरील कार्यालयाची तोडफोड केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Tagged