कोरोनाचे मीटर थांबले; आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठवण्यात आलेल्या एकूण 65 स्वॅब पैकी 63 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे सलग दुसर्‍या दिवशी मीटर थांबले आहे.

   जिल्ह्यातील 65 व्यक्तींचे स्वॅब पाठविण्यात आल्याने जिल्हावासियांना चिंता होती. परंतु 63 अहवाल निगेटिव्ह अहवाल आले आहे. तर 2 रिजेक्टेड आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली. दरम्यान, काल आणि आज कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयातून 2, सीसीसी, बीड-34, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव-8, उपजिल्हा रुग्णालय केज-9, उपजिल्हा रुग्णालय परळी-2, स्वाराती अंबाजोगाई-10 असे एकूण 65 स्वॅब बीड जिल्ह्यातून तपासणीस पाठविण्यात आले आहेत.

आजपर्यंत 116 कोरोना रुग्णांची नोंद (परजिल्ह्यातील 7) झाली आहे. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 79 जण कोरोनामुक्त झाले असून आज 33 रुग्ण उपचाराखाली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

Tagged