atyachar

गोल्डन चॉईसचा व्यवस्थापक अटकेत!

बीड


बीड दि.5 : गोल्डन चॉईस येथे अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरुन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी दोघे अटकेत असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान हॉटेल मालकाला वाचवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

शेख शहेबाज शेख जियाओद्दिन ( वय 20 , रा. इस्लामपुरा, बाबा चौक, बीड) व तसेच हॉटेल गोल्डन चॉईसचे व्यवस्थापक अभिषेक शंकर धनवडे (वय-23, रा. जिंतुर) या दोघांना रात्रीच ताब्यात घेतले असून अटक करून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांच्या फिर्यादीनुसार पीडित मुलीस गोल्डन चॉईस हॉटेलमध्ये रुम नंबर 510 मध्ये नेवुन तिचा विनयभंग केला तर त्यास गोल्डन चॉईस हटिलमध्ये रूम नंबर 510 मध्ये जागा देवुन सहकार्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बीएनएस कलमानुसार पोस्को (बाल लैंगिक अत्याचार कलमानुसार) 74, 75, 49, 54 गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकाचे अतुलकुमार लांडगे करत आहेत.

Tagged