प्रतिनिधी । धारूर
दि.11 : माजलगाव विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांचा प्रचारातील झंजावात सुरू आहे. प्रत्येक स्तरातून त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. धारूर तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसापासून ऋषिकेश आडसकर यांनी तळ ठोकत इथली प्रचार प्रसार यंत्रणा ऍक्टिव्ह केली आहे. ऋषिकेश आडसकर परफेक्ट टाइमिंगसह चोख नियोजन करत असल्याने दिवसेंदिवस आडसकरांच्या समर्थनार्थ अनेक प्रवेश घेतले जात आहेत. याच बळावर धारूर शहरात आडसकरांनाच सर्वाधिक मताधिक्य राहण्याचे अंदाजही वर्तवले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया अवघ्या आठ दिवसावर येऊन ठेपली आहे. सर्वच उमेदवाराकडून आपापल्या परीने मतदार संघात मतदारांच्या मनावर आपली प्रतिमा आणि काम प्रभावी कसे आहे हे दर्शवण्याचा एकसूत्री कार्यक्रम सध्या सुरू आहे. मागील आठ ते दहा दिवसापासून ऋषिकेश आडसकर यांनी धारूर शहर आणि ग्रामीणची सर्व प्रचार प्रसार यंत्रण स्वतः ताब्यात घेत ती यंत्रणा प्रभावी राबवण्यास सुरुवात केलेली आहे. दर दिवशी अनेक तरुणांचे आडसकरांच्या समर्थनार्थ प्रवेश होताना दिसत आहेत. त्याचबरोबर शहरातील व्यापारी वर्गातूनही सकारात्मक पाठिंबा दर्शवला जात असल्याने आडसकरांना धारूर शहरातून अधिकात अधिक मताधिक्य मिळण्याचे अंदाजही वर्तवले जात आहेत. शहरातील वातावरणासह ग्रामीण भागात वाडी, वस्ती तांडे येथे जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम ऋषिकेश आडसकर यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे धारूरच्या मतदारांमध्ये आडसकर यांच्या विषयी असलेल्या सहानुभूतीत वाढ होऊन सहानुभूतीचे रूपांतर मताधिक्यात होण्याची अधिक शक्यता असल्याचे अंदाज वर्तवली जात आहेत.
