गेवराई, दि.३०.तालुक्यातील अर्धमसला गावात जातीवाचक शिवीगाळ करत जिलेटिनचा वापर करत मस्जिदमध्येस्फोट घडवून आणला. ही घटना दि.३० रोजी पहाटे २ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांनी विरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामा गव्हाणे, श्रीराम अशोक सागडे (दोघे रा.अर्धमसला) असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.
राशेद आली हुसेन सय्यद (रा.अर्धमसला) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटल आहे की, दि.२९ रोजी सय्यद बादशहा यांची संदल मिरवणूक होती. यात सर्व समाजाचे लोक सहभागी होत असतात. या दरम्यान गावातील विजय रामा गव्हाणे, श्रीराम अशोक सागळे हे संदली मध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांना उद्देशून जातिवादक शिवेगाळ करत होते. तसेच तुमचे ते काय काम आहे असे म्हणून शिवीगाळ करत होते इथे मज्जित कशाला बांधली ते पाडून टाका नाहीतर आम्ही पाडू असे म्हणत होते. यावेळी बाळासाहेब नरहरी राऊत, सय्यद मझहर सय्यद उस्मान, शेख शफीक शेख युसुफ यांनी संबंधितांना समजून सांगितले. त्यानंतर आम्ही सर्व घरी निघून गेलो. दरम्यान दि.३० रोजी सकाळी २ ते २:३० वाजेच्या दरम्यान मक्का मस्जिदकडून स्फोट झाल्याचा आवाज आला म्हणून मी जागा झालो. तेथे जाऊन पाहिले असता मस्जिदमधून बाहेर धूर येत होता. आतमध्ये जाऊन पाहिले असता दरवाजे, खिडक्या, पंखे व इतर साहित्य तुटलेले होते. तसेच नमाज पडण्याचे मेंबर व त्याच्यावर ठेवलेले धार्मिक पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली दिसले. यावेळी सय्यद मझहर सय्यद उस्मान याने काही वेळापूर्वी मस्जिदजवळून विजय रामा गव्हाणे व श्रीराम अशोक सांगडे यांना पळून जाताना पाहिले होते. तर विजय रामा गव्हाणे यांनी सोशल मीडियावर जिलेटिनचा कांड्या बांधलेला एक व्हिडिओ टाकला होता. यावरून विजय रामा गव्हाणे व श्रीराम अशोक सागडे यांच्या विरोधात कलम २९८, २९९, १९६, ३२६, ३५१ (२), ३५१(३), ३५२, ६१(२), ३(५), ३,४,५ भा. न्या. स.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पो. नि.सोमनाथ नरके करत आहेत.