BEED JILHA KARAGRUH,

वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला जेलमध्ये आठवले गँगकडून मारहाण

क्राईम बीड मराठवाडा

बीड, दि.31 : बीडच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये वाल्मिक कराड WALMIK KARAD आणि सुदर्शन घुले SUDARSHAN GHULE यांना आठवले गँगचे अक्षय आठवले AKSHAY ATHVALE आणि महादेव गिते MAHADEO GITE या दोघांकडून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

वाल्मिक कराड, सुदर्शन घुले या दोघांसह इतर काही आरोपींना संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत बीडच्या कारागृहात बंदीस्त आहेत. त्याचवेळी आठवले गँगचे अक्षय आठवले आणि महादेव गिते हे दोघेही याच कारागृहात आहेत. अक्षय आठवले हा देखील कुख्यात असून त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. सकाळी कैद्यांना जेव्हा नेहमीप्रमाणे बाहेर सोडण्यात आले त्यावेळी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मारहाणीत कोणाला काही इजा झालेली नाही, असेही सांगण्यात येते.

याबाबत आष्टीचे आ. सुरेश धस म्हणाले की, महादेव गिते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा राग असू शकतो. लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केले आहेत. त्यामुळे झापडझुपड झालेली असू शकते, असे आ. सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपुरच्या जेलमध्ये हलवावे, अशी मागणी देखील आ. सुरेश धस यांनी केली आहे.

दरम्यान जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेलच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महादेव गिते कोण?
सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात ज्या घरात घटना घडली ते घर महादेव गिते याचे आहे. महादेव गिते हे बबन गिते यांचा पंटर असल्याचही माहिती आहे. त्याच महादेव गितेकडून मारहाणीची घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

Tagged