बीड, दि.1 : बीडच्या जिल्हा कारागृहात काल सकाळी मोठा राडा झाला होता. सुदीप रावसाहेब सोनवणे sudip sonwane आणि राजेश अशोक वाघमोडे rajesh ashok waghmode या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर कारागृह प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क झाले आहे. कालच प्रशासनाने बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गितेसह mahadeo gite मुकूंद गिते mukund gite, राजेश नेहरकर rajesh neharkar, आणि राजेश वाघमोडे rajesh waghmode यांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलविण्यात आले होते. आज पुन्हा आठवले गँगचे अक्षय आठवले akshay athwale, मनिष क्षीरसागर manish kshirsagar, ओंकार सवाई onkar swai यांना नाशिक कारागृहात हलविण्यात आले आहे.
सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे हे दोघे आपआपल्या नातेवाईकांना फोनवर बोलण्यासाठी कारागृहाच्या सर्कलमध्ये आलेले होते. या दरम्यान दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यावेळी कारागृहातील इतर कैदीही जमा झाले. त्यामुळे काही काळ जेलमध्ये गोंधळ उडाला होता. परंतु इकडे बाहेर वाल्मिक कराड walmik karad आणि सुदर्शन घुले sudarshan ghule यांना जेलमध्ये मारहाण झाल्याची बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आणि काही नामांकित वेब पोर्टलने दिल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. परंतु लगेच जेलप्रशासनाने हे वृत्त अत्यंत चुकीचे असल्याचे प्रेस नोट काढून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यापासून दुखावलेले अनेक छोटे मोठे गुंड, कार्यकर्ते बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यांच्यापासून वाल्मिक कराड यांच्या जिवाला धोका होऊ शकतो, असे प्रशासनाच्या वारंवार लक्षात येत होते. काल राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यातील शाब्दीक चकमक त्याची सुरूवात होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जेल प्रशासनाने आज पुन्हा आठवले गँगच्या सदस्यांना नाशिक कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान आमचा भांडणात काहीही संबंध नसताना आम्हाला विनाकारण टार्गेट केले जात आहे. जेल अधीक्षक मुलाणी आणि चिंचाणे हे दोघे यासाठी कारणीभूत आहेत, असा आरोप यावेळी आठवले गँगच्या सदस्यांनी आपल्या नातेवाईकांशी बोलताना केला.