लिंबागणेश आरोग्य केंद्र सील

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 45 वर्षीय आरोग्य सहाय्यक कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे केंद्र सील केले आहे. संपर्कातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.

   जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी 16 पॉझिटिव्ह आले असून त्यात बीड तालुक्यातील 5 जण होते. त्यापैकी एक पुरुष हे आरोग्य सहाय्यक असून ते लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. ते बीड येथे वास्तव्यास होते. परंतु कर्तव्यावर नियमित असल्यामुळे आरोग्य केंद्र सील केले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी लिंबागणेश येथे दाखल झाले आहेत.