corona

राज्यात आज 3390 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

महाराष्ट्र

मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ८७ हजार ५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बीड: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१ , पुणे १ मृत्यू असे आहेत.