परळीत रेल्वे खाली येऊन २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

बीड

परळी : रेल्वे स्टेशन या ठिकाणी सोमवार (दिनांक9) रोजी सकाळी नऊ वाजता नांदेड बेंगलोर लिंक एक्सप्रेस परळी रेल्वे स्टेशन मध्ये येत असताना एका पदार्थ विक्रेत्याचा रेल्वे खाली हात निसटून पडल्याने दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून रेल्वे रुळावर त्याचे शरीराचे तुकडे पडले होते. हा मुलगा राहणार उत्तर प्रदेश या | ठिकाणचा असून त्याचे अंदाजे वय २० ते २२ वर्ष आहे.हा युवक व्यवसायासाठी परळीत रेल्वे स्टेशन या ठिकाणी कामाला होता. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डेड बॉडी परळी उपजिल्हा रुग्णालय पोस्टमार्टम साठी पाठवली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.