कोरोनामुळे माजी खासदाराचा मृत्यू

महाराष्ट्र

बीड : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जळगाव जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आज त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जळगावमध्ये त्यांची स्वॅबची चाचणी केली असता कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जावळे यांना उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Tagged