मी यादी दिली तर फिरणं मुश्कील होईल”; शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

बीड

”ज्यांचं नाव तुम्ही घेता, त्यांची लायकी नाही, त्यांना कशाकशातून बाहेर काढलं याची जर यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल, असे म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता जबरी पलटवार केला. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग मी आता बोलू इच्छित नाही. त्यांना एक लहान कुटुंबातला, लहान समाजातला एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती, हे सगळं माहिती असतानासुद्धा ते आता माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करायला लागले, कुटुंबावर हल्ले करायला लागले त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही. आज शेवटचा उल्लेख त्यांच्याबद्दलचा माझ्याकडून होईल,” अशी संतापजनक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंकड़ून होत असलेल्या व्यक्तिगत टीकेवर शरद पवारांनी नाव न घेता मुंडेंना चागलंच सुनावल्याचं दिसून येत आहे