fire

परळीत गोळीबार, सरपंच ठार!

बीड


-घटनेने जिल्ह्यात खळबळ
प्रतिनिधी । बीड
दि.29 ः परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी (दि.29) रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका सरपंचाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून गोळीबार करणार्‍यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

बापुराव आंधळे असे गोळीबारात मयत झालेल्याचे नाव आहे, तर अन्य एक गंभीर जखमी असून त्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. आंधळे हे मरळवाडीचे सरपंच आहेत. शनिवारी रात्री परळी शहरातील बँक कॉलनीत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनास्थळी परळी शहर पोलीस दाखल झाले आहेत.

Tagged