acb office beed

महावितरणला एसीबीचा झटका!

बीड


लाईनमनसाठी 15 हजाराची लाच घेताना एजंट पकडला


बीड दि.19 : जुने मीटर काढून नवीन मीटर बसून देण्यासह वीज चोरीचा दंड न लावण्यासाठी लाईनमनने पंधरा हजाराची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना खाजगी इसमाला बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमंत जीवराज मुंडे (लाईनमन वर्ग-3 रा.श्रेया निवास, साई सदन कॅालनी, शिंदे नगर, फेज 2 , कॅनल रोड बीड व सय्यद आयुब मोहम्मद (वय 42 हॉटेल चालक, रा.मांडवजाळी ता.बीड) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांचे मंजिरी फाटा पाली येथे व्यावसायिक मीटर असून तेथील मीटर जळाल्याने तक्रारदार याने नवीन मीटर बसून देण्यासाठी अर्ज केला होता. तसेच नवीन मीटर विकतही घेतले होते, जुने मीटर काढून नवीन मीटर बसून देण्यासाठी तसेच वीज चोरीचा अतिरिक्त दंड न लावण्यासाठी आरोपी लोकसेवक मुंडे यांनी 20 हजाराची मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. खाजगी इसम अयुब यांचेकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. आरोपी मुंडे यांचे सांगण्यावरुन आरोपी खाजगी इसम अयुब याने मंजरी फाटा येथील खाजगी इसम अयुब यांचे होटेलमधे पंधरा हजाराची लाच स्वीकारताच त्यास रंगेहाथ पकडले. कार्यारंभ… लाचखोर अयुब अटकेत असून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, पर्यवेक्षण अधिकारी व सहसापळा अधिकारी उपअधीक्षक शंकर शिंदे, सापळा पथक सुरेश सांगळे, अमोल खरसाडे, संतोष राठोड, श्रीराम गिराम , गणेश मेहेत्रे, सुदर्शन निकाळजे यांनी ही कारवाई केली.

https://karyarambh.com/wp-admin
Tagged