ग्रामविकास विभागाकडून आदेश जारी
केज : वडवणी, पाटोद्यासह केज पंचायत समितीला आता नवीन पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळाले आहेत. या बदल्यांबाबतचे आदेश ग्रामविकास विभागाने सोमवारी (दि.30) जारी केले आहेत.
वडवणी येथे रिक्त पदी केज येथून गटविकास अधिकारी विट्ठल नागरगोजे यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या जागी केज येथे पाटोदा येथून राजेंद्र मोराळे यांची नियुक्ती केली. तसेच, पाटोदा येथे रिक्त पदी मेहकर (जि.बुलढाणा) येथून एस.के. जाधव यांना नियुक्त देण्यात आली आहे. पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळाल्याने पंचायत समिती स्तरावरील कामांना गती मिळणार आहे.