केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षे होते.

11 सप्टेंबरला ते पॉझिटिव्ह आढळले होते. तेव्हा त्यांना कुठली लक्षणे नव्हती. आपली प्रकृती उत्तम असल्याचे तेव्हा ट्विट देखील त्यांनी केलं होते. नंतर झपाट्यानं प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. कर्नाटकमधल्या बेळगावमधून ते खासदार म्हणून निवडून यायचे.

Tagged