मराठ्यांनो कामे बुडवून अंतरवालीकडे येऊ नका, मी लढायला खंबीर

बीड


बीड दि.21 : मराठा समाजाने आपली कामे बुडवून अंतरवलीकडे येऊ नये. मी लढायला खंबीर आहे. फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांनी दोन चार दिवसात मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर 2024 उलथपालथं केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा देत मराठा समाजाने शांतता राखण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

   मराठा आरक्षणासाठी सहाव्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून अंतरवालीत मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच बीड जिल्हाही कडकडीत बंद आहे. मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले की, तत्काळ Ews प्रमाणपत्र लागू करावे व फडणवीसांना पुन्हा एकदा संधी देतोत त्यांनी मराठा आरक्षणच्या मागण्या पूर्ण कराव्यात, आम्हाला आरक्षण दिल्यावर राजकारणात येण्याची गरज नाही. जर त्यांनी आरक्षण देण्यास धोका दिल्यास मराठा समाज त्यांच्यासोबत राहणार नाही. चार दिवसात फडणवीस यांनी मागण्या पूर्ण कराव्यात. नाही केल्यास मराठ्यांचे पोरं सोपे नाहीत. मला राजकारणात यायचं नाही. जीव जाळून सांगतो, मराठा बांधवांनी शांतता ठेवावी असेही जरांगे पाटील म्हणाले. 

मंत्री या नाही तर नका
येऊ पण आम्ही जिंकणार
दोन हाताने टाळ्या वाजवल्यासारखे यांचे आंदोलने सुरू आहेत. मला भेटायला मंत्री आले की आमच्याकडे का आले नाही म्हणतेत. आमच्याकडे मंत्री येऊ नाही तर नाही येऊ पण आम्ही जिंकणार आहोत. माझा समाजावर आणि समाजावर विश्वास आहे.

जातीय दंगली घडवायच्या आहेत.
आंदोलनासमोर आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली कशी? अशी आंदोलने म्हटल्यवर वाद होईल. आणि भुजबळ, फडणवीस यांना दंगल घडवायच्या आहेत. पण आपल्याला दंगल घडवायची नाही. आपण शांत राहायचं. आपली ताकत ओळखा आपली ताकत खूप आहे. आपण अन्याय करायचा नाही. फक्त शांत रहा, सहन होतंय तोपर्यंत करा..

13 महिने झाले शांत
होतोत, अजूनही शांतच रहा
वडीगोद्री हे गावकरी आपले आहेत. धनगर बांधव आपला आहे. हे उपोषण करण्यासाठी आलेले टकुचे दंगल घडावी यासाठी आलेले आहेत. जालना जिल्हाधिकारी, डीवायएसपी हे अधिकारी चांगले आहेत. चांगल्याना आम्ही चांगले आहोत. कायदा सू व्यवस्था पाहून त्यांना दुसरीकडे बसवा. हे जालना एसपी यांनी लक्षात घेतले पाहिजे.

परळीतून गाड्या पाठवणाऱ्याच
अन् येवल्यावाल्याच बघतो
वडीगोद्री येथील आंदोलनासाठी परळीतून गाड्या पाठवल्या. त्या गाड्या पठवणाऱ्याच आणि दंगल घडवण्यासाठी आंदोलनासमोर आंदोलन करण्यासाठी टोळ्या पाठविणाऱ्या येवल्यावाल्याच बघतोच असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Tagged