भीषण अपघातात माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन

बीड

लातूर जिल्ह्यातील घटना; राजकीय वर्तुळात शोककळा

बीड : लातूर जिल्ह्यातील बेलकुंड (ता. औसा) परिसरात आज (दि.२६) भीषण अपघात घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेले माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आर.टी. देशमुख (जिजा) यांचे दुर्दैवी निधन झाले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

आर.टी. देशमुख यांच्या गाडीला (एमएच ४४ एडी २७९७) औसा रोडवर अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. ते लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. माजलगावमधून ते आमदार झाले. भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय वर्तुळात आणि भाजपमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक तपशील येणे बाकी आहे.