MURDER

अल्पवयीन विवाहितेचा खून

क्राईम बीड वडवणी

गळा दाबून खून केल्याचा पोलीसांचा संशय
 वडवणी : येथे एका अल्पवयीन विवाहितेचा खून केल्याचा प्रकार बुधवारी (दि.1) सकाळी उघडकीस आला आहे. सदरील घटना मंगळवारी घडली असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

     शितल दादासाहेब तोघे (वय 14 रा.चिखलबीड ता.वडवणी) असे मयताचे नाव आहे. तिच्या माहेरी पिंपळा येथे शेतामध्ये मृतदेह आढळून आला. तिचा गळा दाबून खून केला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी वडवणी पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि.महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Tagged