paithan-corona-upachar-kaks

पैठणचा आकडा 182 वर

कोरोना अपडेट मराठवाडा

आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, 66 जणांची यशस्वी मात

पैठण, दि.25 : पैठण तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत 182 जण कोरोना बाधित रुग्ण वेगवेगळ्या गावांमध्ये आढळून आले आहेत. यामध्ये 66, रुग्ण पूर्णतः बरे झाले असून 5, जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.
पैठण तालुक्यांमध्ये सुरुवातीपासूनच विविध गावांमध्ये एक किंवा दोन रुग्ण आढळून येत होते. मात्र औरंगाबाद सारख्या रेड झोन परिसरातून पैठण याठिकाणी ये-जा करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये झाला. आत्तापर्यंत पैठण शहरासह पाचोड, विहामांडवा, चितेगाव, बालानगर, ईसरवडी, पाटेगाव, नवगाव या गावांमध्ये बाधित रुग्ण आढळून आलेले आहे तालुक्यात आतापर्यंत 182 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 66 जण बरे झालेले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पैठण शहरांमधील 2, पाचोड येथील 1, कोरोना केअर सेंटरवर जवळपास 80, रुग्णावर आरोग्य विभागामार्फत आरोग्य हेल्थ युनिटचे प्रपाठक डॉ ऋषिकेश खाडिलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भूषण आगाज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम उपचार सुरू आहे. बाधित रुग्ण आढळलेला शहरातील परिसर मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आलेली आहे.

Tagged