ria-shouvik

रिया अडचणीत; ड्रग्ज मागवत असल्याची भावाकडून कबूली

देश विदेश न्यूज ऑफ द डे मनोरंजन

मुंबई, दि.4 : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. रिया सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होती, अशी कबुली रियाचा भाऊ शोविकने एनसीबीकडे (अंमली पदार्थ विरोधी पथक) दिली. त्यानंतर ड्रग्ज प्रकरण समोर येऊ लागल्याने शोविकला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. रिया चक्रवतीलाही उद्या चौकशीनंतर अटक होण्याची दाट शक्यता आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयला ड्रग्ज संदर्भातील चॅट रियाच्या एका ग्रुपवर सापडले होते. त्या चॅट प्रकरणाच्या चौकशीत सुशांतचा मॅनेजर सॅम्युअर मिरांडा आणि अब्देल बासित परिहार यांना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीतून शोविकचे नाव पुढे आले. शोविकच्या सांगण्यावरुनच आपण ड्रग्ज खरेदी केले असे चौकशीत समजले त्यावरून शौविकलाही आज अटक करण्यात आली आहे.

Tagged