ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीला अटक

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे मनोरंजन

बेंगळुरू : अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे विभागाने (सीसीबी) मंगळवारी संजना गलरानी या कन्नड अभिनेत्रीला अटक केलीय. या प्रकरणात अगोदर रागिणी द्विवेदी हिलाही अटक करण्यात आली आहे. संजनाला पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील घरातून ताब्यात घेतलं. आधीच अटकेत असलेला वीरेन खन्ना याच्या घरावर पोलिसांनी छापाही मारला. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 13 जणांना आरोपी बनवण्यात आलंय तर पाच जणांना अटक करण्यात आलीय.

कन्नड सिने इंडस्ट्रीत होत असलेल्या ड्रग्जच्या वापराची चौकशी मध्यवर्ती गुन्हे विभागाकडून सुरू आहे. याच प्रकरणात चौकशीनंतर मंगळवारी संजना गलरानी हिला अटक करण्यात आली. यापूर्वी शहरात हाय-प्रोफाईल पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला शहर पोलिसांनी अटक केली होती. यानंतर मंगळवारी मध्यवर्ती गुन्हे विभागानं गलरानीच्या इंदिरा नगर परिसरातील घरावर छापा टाकला त्यानंतर तिला अटक करण्यात आलीय. यानंतर संजनाला मध्यवर्ती गुन्हे विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं.

Tagged