SMOKING

ऐकावं ते नवलच! 10 हजार लोकसंख्येच्या गावात एकही जण व्यसनी नाही

देश विदेश

दि.2 : आपल्या किंवा आपल्या पंचक्रोशीतील एखाद्या गावातील अख्खं कुटुंब निर्व्यसनी सापडणं तसं अवघड काम. पण एखाद्या जिल्ह्यात 10 हजार लोकसंख्येचं गाव निर्व्यसनी आहे असे आपल्याला सांगितले तर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.
उत्तर प्रदेशच्या देवबंद तालुक्यातील मिर्झापूर या पवित्र गावात कोणीही धूम्रपान किंवा मद्यपान करीत नाही. विशेष म्हणजे मिर्झापूर गावाची इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हर्च्युअल व्हिलेज म्हणजे पवित्र गाव म्हणून नोंद झाली आहे.
10,000 लोकसंख्या असलेले मिर्झापूर गाव मद्यपान, धूम्रपान आणि मांसाहारापासून पूर्णपणे मुक्त असलेले गाव आहे. मिर्झापूर देवबंद-मंगलोर रोडवर आहे. या गावातील लोक 500 वर्षांपासून धूम्रपान, मद्यपान, मांसाहार करीत नाहीत. इतकेच नव्हे तर तम गूण असलेले कांदा व लसूणसुद्धा खात नाहीत. हा सिद्ध पुरुष फकिरदास बाबांचा आशीर्वाद असल्याचे या गावाचे रहिवासी मानतात. बाबा फकिरदास राजस्थानमधून मिर्झापूर या गावात आले होते. ते ब्रह्मदेवाचे स्थान पुष्कर-अजमेर मार्गावरील इंद्रपूर येथून आले होते. हरिद्वारमधून परत येताना ते मिर्झापूर येथे आले. येथील शिवमंदिरात त्यांनी मुक्काम केला. व येथेच एका उंच टेकडीवर सिद्धकुटी आश्रम बांधला. त्यानंतर ते येथे कामयस्वरूपी वास्तव्यास राहीले. त्यांच्या स्मरणार्थ मिर्झापूरया गावात दरवर्षी यात्रा भरते. फकिरदास बाबांनी याच आश्रमात 500 वर्षांपूर्वी “गंठा (कांदा) लसन, तंबाखू जोई। मदिरा मांस तजे शिष्य कोई। साठा (आपला) धर्म रहेगा जबतक। मिरगापूर सुख पावेगा तब तक॥” हा दोहा लिहिला. याचे पालन मिर्झापूरचे रहिवासी आजही करतात.

Tagged