kim jong's wife

किम जोंगने पत्नीसाठी बॉम्बने उडवले ऑफिस

देश विदेश न्यूज ऑफ द डे

वृत्तसंस्था | उत्तर कोरीया
उत्तर कोरीयाचा सर्वेसर्वा किम जोंग कायमच त्याच्या रागामुळे प्रसिद्ध असतो. यावेळी तो त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते उडवून दिले.

उत्तर कोरियाने केलेल्या या कारवाईचे कारण समोर आलें असून किम यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत केल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची चर्चा आहे.
उत्तर कोरीयातुन पळून गेलेल्या लोकांकडून दक्षिण कोरियातून किमविरोधी पत्रके पाठवण्यात येत होती यात किम यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याशिवाय त्यांचे आक्षेपार्ह छायाचित्रही प्रसारीत करण्यात आले होते.

त्यामुळे किम यो यांनी दक्षिण कोरियाकडे या बंडखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. किम यांच्या पत्नीबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात येत असल्याच्या वृत्ताला उत्तर कोरियातील रशियन दूतावासाने दुजोरा दिला असल्याचे ’डेली मेल’ने म्हटले आहे.
उत्तर कोरियात सोडण्यात येणार्‍या फुग्यांवर, पत्रकांमध्ये किम यांची पत्नी री सोल जू यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा आणि छायाचित्राचा वापर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Tagged