पैठण दि. 11 : शहरातील लक्ष्मीनगर परिसरात गोलनाका या ठिकाणी शौचालयासाठी बसलेल्या एका व्यक्तीस बेदम मारहाण करून लूटमार करणाऱ्या तिघांना पैठण पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक कोयता, मोबाईल लूटमार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील गोलनाका या ठिकाणी मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सुभाष बापुराव डोलारे हे शौचालयसाठी बसले असता अचानक तीन अज्ञात तरुणाने येऊन हातातील कोयत्याचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. व खिशातील दोन हजार रुपये रोख व मोबाईल लुटून गंभीर दुखापत केली. जखमी डोलारे यांनी पैठण पोलीस ठाणे गाठून काही तरुणांनी मारहाण करून लूटमार करणाऱ्या विरुद्ध तक्रार दिली. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस उपनिरीक्षक छोटूसिंग गिरासे, रामकृष्ण सागडे, पोलिस जमादार सुधीर वाहुळ, पो काॅ नाईक यांनी तातडीने आरोपी शोधण्याचे आदेश दिले या पथकाने तपासाची चक्र फिरवीत या घटनेतील लूटमार करणारे आरोपी ईश्वर शेषराव भालके, ऋषिकेश बाळू चाटूपळे, सागर अशोक काते या त्रिकुट आरोपीला अटक करून कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. न्यायालयाने तिन्ही आरोपीला हर्सुलकारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छोटूसिंग गिरासे हे करीत आहे.
