‘या’ वेळेत मटन विक्रीस मुभा

न्यूज ऑफ द डे बीड

दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक

बीड : जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मटन विक्रीची दुकाने पूर्णतः बंद होती. परंतू, उद्यापासून (दि.29) ही दुकाने सुरु ठेवण्यास मुभा दिली असून सकाळी 7 ते 10 या वेळे दुकाने खुली ठेवता येणार आहेत.

  जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मटन विक्रीच्या दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. परंतू, दुकाने खुली ठेऊन मटन विक्रीस मुभार देण्याची मागणी झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शिथीलता दिली आहे. दुकानदानारांनी अ‍ॅन्टीजन वा आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच, मास्कसह सोशल डिस्टन्सचे पालन करून दुकाने उघडायची आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही आदेशात दिला आहे.

Tagged