बहिणीबद्दल वाईट चर्चा केल्यामुळे तरुणाचा खून

क्राईम बीड

बीड : बहिणीबद्दल वाईट चर्चा केल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण केली. छातीत जोराची वीट लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.9) दुपारी आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द (मेहकरी) येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संजय वणवने (वय 34 रा. कानडी ता.आष्टी) असे मायताचे नाव आहे. याने आरोपीच्या बहिणीची वागणूक चांगली नसल्याचे तिच्या पतीला फोन करुन सांगितले. अशी खोटी माहिती का दिली याचा जाब विचारण्यासाठी आरोपी संजयच्या घरी गेले. यावेळी वाद झाला आणि संजयला विटाने मारहाण केली. छातीत विटांचा जोराचा मार लागल्याने संजयचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विजय लागारे आदींनी भेट दिली असून या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged