चमचमीत कडधान्याचे चॅट

महिला

सध्या आपण सगळे घरी आहोत, सतत काहीतरी खावं असं आपल्याला वाटतं. अशावेळी झटपट बनणारा आणि चवीला उत्तम पदार्थ बनवायचा असेल तर कडधान्याच्या चॅटला पर्याय नाही.

साहित्य : कोथिंबीर, टोमॅटो, हरभरे, मूग, मटकी, चवळी, मसूर मोड आलेले 1 वाटी मिश्रण, कांदा (अर्धी वाटी बारीक चिरलेला), नारळाचा किस 1 वाटी, शेव 1 वाटी, डाळिंबाचे दाणे 1 वाटी, साखर, चाटमसाला 2 चमचे, तिखट, लिंबू व मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम मोड आलेली सर्व कडधान्ये एकत्र करून कुकरमध्ये शिजवून घ्या. 1 चमचा तेलाची फोडणी करून परतून घ्या. मीठ, तिखट, हळद पावडर, साखर घाला. बाऊलमध्ये कडधान्य घेऊन त्यावर कोथिंबीर, टोमॅटो, नारळाचा खीस, डाळिंबाचे दाणे व चाट मसाला व लिंबाचा रस घाला. त्यावर शेव टाका. आता तुमची चाट खाण्यासाठी तयार आहे.

Tagged