Shilpa Shetty

वडिलांच्या इच्छेविरोधात शिल्पा शेट्टीने केलं होतं कलाविश्वात पदार्पण

मनोरंजन महिला

आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर सोशल मीडियावरही शिल्पाने तिचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ती कायम चर्चेत असते. कलाविश्वात स्वतंत्र स्थान मिळवणार्‍या या अभिनेत्रीने वडिलांच्या मनाविरुद्ध या क्षेत्रात पदार्पण केल्याचं म्हटलं जात आहे.

उत्तम अभिनयाच्या जोरावर शिल्पाने कलाविश्वात तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. मात्र क्षेत्रात येण्यासाठी शिल्पाने तिच्या वडिलांचा विरोध पत्करला होता. शिल्पाने कलाविश्वात पदार्पण करुन नये अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये बोलत असताना शिल्पाने याविषयी खुलासा केला. ’तू कलाविश्वात पदार्पण करु नये अशी तुझ्या वडिलांची इच्छा होती हे खरं आहे का?’ असा प्रश्न शिल्पाला विचारण्यात आला होता. त्यावर शिल्पाने होकारार्थी उत्तर देत वडिलांच्या या मतामागचं कारण सांगितलं. हो. त्यावेळी मी वाणिज्य शाखेत शिकत होते. आम्ही दोघींच बहिणी होतो. त्यामुळे माझ्या वडिलांना कायम असं वाटायचं की मी एक बिझनेस वुमन व्हावं. त्यांना वाटायचं मी एखादा चित्रपट करेन आणि त्यानंतर मला काम मिळणार नाही. मात्र पुढे याच क्षेत्रात माझं करिअर घडलं. त्यावेळी त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की, काहीही झालं तरी शिक्षण अर्ध्यावर सोडायचं नाही. शिक्षण पूर्ण करायंच, असं शिल्पा म्हणाली.

Tagged