अखेर हरिभाऊ खाडेंना बेड्या!

बीड दि.23 ः एक कोटीच्या लाच प्रकरणात फरार असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या शोधार्थ चार पथके रवाना करण्यात आली होती. अखेर गुरुवारी (दि.23) हरिभाऊ खाडेंना अटक करण्यात बीड एसीबीला (beed acb team) यश आले आहे. (pi haribhau khade arrested) आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार रविभुषण जाधव यांनी तक्रारदारास […]

Continue Reading
RAJESH SALGAR

हरिभाऊ खाडेनंतर लाचखोर राजेश सलगरच्या घरातही सापडले घबाड!

रोख रक्कम, सोने, चांदी केली जप्त बीड दि. 23 : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (police inspecter haribhau khade) यांच्या घर झडतीमध्ये एक कोटी रोख, एक किलो सोन्याची दागिने आणि पाच किलो चांदी असा मुद्देमाल सापडला होता. त्यानंतर काल परळीत केलेल्या कारवाईत कार्यकारी अभियंता राजेश सलगर (Executive engineer rajesh salgar) याची बीड एसीबीच्या […]

Continue Reading
mobile chor, mobile chori

बीडमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला लुटले!

हातातील अंगठ्या, रोख रक्कम असा 66 हजारांचा मुद्देमाल लंपास बीड : बीड जिल्ह्यात चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बस, बसस्थानक येथील चोऱ्यांसह घरफोड्याही वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाईत मोदींच्या सभेच्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त असताना चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळविले, त्यानंतर बीडमध्ये मोदींच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला पकडुन हातातील अंगठ्या, रोख रक्कम असा ऐवज […]

Continue Reading

जागोजागी नाकाबंदी, मोदींची होणार आहे सभा; त्याच भागातून एटीएम मशीन चोरी!

बीड दि.5 : अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चौक परिसरातून एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. यामध्ये 19 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईत सभा होणार असून त्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दोन दिवसांनी म्हणजे 7 मे रोजी अंबाजोगाई शहरात पंतप्रधान नरेंद्र […]

Continue Reading

बजरंग सोनवणेंना निवडणूकीत हाबाडा दाखवणार !

धारुर आसरडोहमध्ये पंकजाताई मुंडेंचे रमेश आडसकरांनी केले जबरदस्त स्वागतरुर दि.3 ः भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आपल्या जिल्हयाला लाभलेलं एक सक्षम नेतृत्व आहे तर दुसरीकडे समोरचा उमेदवार कोण यापेक्षा त्या उमेदवाराचा अनुभव आपल्या परिसरातील सर्वच लोकांना आलेला आहे, त्याबद्दल वेगळे सांगायची आपल्याला गरज नाही. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना हाबाडा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा […]

Continue Reading
acb office beed

सहा हजाराची लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

-वारसा हक्कानुसार सातबार्‍याला नोंद घेण्यासाठी मागितली होती लाचगेवराई दि.24 ः वारसा हक्कानुसार सातबार्‍याला नोंद घेण्यासाठी गेवराई तालुक्यातील रांजणी सज्जाच्या तलाठ्याने 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी बीड एसीबीने बुधवारी (दि.24) कारवाई करत तलाठ्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (gevarai trap talathi) सानप राजाभाऊ बाबुराव (रा. संभाजीनगर हनुमान मंदिराजवळ, नगर रोड बीड) […]

Continue Reading
acb office beed

सगळं करणारे आम्हीच, पैसे देऊन टाक.. ट्रॅपमध्ये चौथा आरोपी अडकला!

–लाच मागणारा, स्विकारणारा, प्रोत्साहन देणाराअन् आता सगळं व्यवस्थित करणाराही अटकेत -सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी   केशव कदम । बीडबीड दि. 22 ः भावाभावात झालेल्या वादामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने लाचेची मागणी केली, मात्र मध्येच काम आल्याने हवालदार बाजुला गेले, अन् त्यांची अर्धवट राहिलेली बोली सोबत असलेल्या सोनवणे मुनशी यांनी पूर्ण केली. ‘सगळं […]

Continue Reading
acb trap

लाच मागणारा, लाच स्विकारणारा, लाचेसाठी प्रोत्साहन देणारा अटकेत!

तलवाडा पोलीस ठाण्यातील लाचखोरी चव्हाट्यावर ; बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई बीड दि.21 : भावाभावात झालेल्या वादामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने 15 हजाराच्या लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम खाजगी इसमाकडे देण्यास सांगितली. तर दुसर्‍या खाजगी इसमाने ही लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. बीड एसीबीने (beed acb team) सापळा रचत 15 हजाराची लाच घेताना […]

Continue Reading

नात्यातीलच तरुणाने मित्रांच्या मदतीनेकेली अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या!

बीड दि.24 : मुलगी अल्पवयीन असल्याने कुटुंबीयांनी लग्नला विरोध केला, 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न लावून देऊ असेही सांगितले. मात्र नात्यातीलच तरुणाने मित्रांच्या मदतीने मुलीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपीने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना बीड तालुक्यातील घोसापूरी येथे शनिवारी (दि.24) रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून […]

Continue Reading

अंमळनेर परिसरात गोळीबार!

पाटोदा दि. 18 : तालुक्यातील अंमळनेर परिसरातील चिखली परिसरात सोमवारी (दि.18) पहाटेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली असून यामध्ये तीन ते चार जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. घटनास्थळी अंमळनेर पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास करत आहेत. किरकोळ वादातून हा गोळीबार केल्याची माहिती आहे. दरम्यान अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ यांच्याशी […]

Continue Reading