chousala

चौसाळा येथे नदीला पूर; 5 गावांची वाहतूक विस्कळीत

बीड शेती

पावसाची दमदार हजेरी
चौसाळा : यंदा दरवर्षीप्रमाणे मृग नक्षत्रात मान्सूनच्या पावसाचे आगमन अगदी धडाक्यात झाले आहे. सलग दोन दिवसांच्या पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गासह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी साडेचार ते साडेपाच या एक दीड तासांच्या कालावधीत नदी नाल्यासह चौसाळा व चौसाळा परिसरातील नदी पात्रात पाणी वाहू लागले आहे.

वास्तविक पाहता अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गासह परिसरातील नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. चौसळा परिसरात गावानजीक वाहणारी नदी पहिल्या पावसात प्रथमच अगदी तुडूंब भरून वाहिली. कोरोनाचे महाकाय संकट या पावसात वाहून जावे असे प्रत्येकाचे मन बोलतांना सहजतेने प्रकट होते. चौसाळा ते पिंपळगाव, वाढवणा, मानेवाडी, रिव्हगवण, माळवाडी या गावाला जाणार रस्ता पाणी पुलाच्या वरून वाहत असल्यामुळे वाहतुकाही काळ बंद झाली होती चौसाळा पावसाळा आला की या पाच गावाला जाणारा चौसाळा जवळील नदीवरील पूल कमी उंचीचा असल्याने पुलाच्या वरून पाणी वाहते, यामुळे काही वेळासाठी रस्ता बंद होतो. या नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी पाच गावातील नागरिकांनी केले आहे. तसेच वाढवणा येथील चौसाळा शहराला पाणी पुरवठा करणारे संगमेश्वर धरणामध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Tagged