मसरतनगर; ‘त्या’ पन्नास जणांवर गुन्हा दाखल

क्राईम बीड

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे केले उल्लंघन

बीड – हैद्राबाद येथून बीड शहरात येऊन होम क्वॉरंटाइन राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही शहरात फिरले व विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. 200 ते 300 लोकांना कोरोना संसर्ग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मसरत नगरमधील विवाहसोहळा आयोजकासह पन्नास जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील मसरत नगर भागातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या अन प्रशासनासाहित शहरवासियात खळबळ उडाली. हे पॉझिटिव्ह आलेले लोक हैदराबाद येथून प्रवास करून परत आले होते, त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले असतांनाही लग्नाला उपस्थिती लावली, त्यानंतर शहरभर फिरत बसले .
त्यामुळे बीड शहरातील अनेक भागात फिरून एका विवाहसोहळ्यास उपस्थित दर्शवली. म्हणून 40 ते 50 जणांवर नायब तहसीलदार यांच्या फिर्यादिवरून बीड शहर पोलीस ठाण्यात कलम 188, 186, 269, 270, 271, भदवी सहकलम 54 राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम 2 ,3, 4, कलम 17 महाराष्ट्र पोलीस आधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि.धोत्रे हे करत आहेत.

Tagged