shivasena, mahayuti,ajeet pawar

अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

“Eknath Shinde Big Statement on Nashik and Thane Lok Sabha Candidacy”

Eknath Shinde | महायुतीमध्ये काही जागावाटपवरून अजूनही तिढा निर्माण झाला आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपने दावा केला होता. त्यामुळे इथे कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

शिवसेनेनं काल लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमदेवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आमदार रवींद्र वायकर आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात आमदार यामिनी जाधव यांना उमेदवार जाहीर झाली आहे. आता नाशिक आणि ठाण्याची जागा कुणाला मिळणार, याबाबत अखेर खुलासा झाला आहे.

नाशिक आणि ठाण्याचा तिढा सुटला

नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनी इच्छा दर्शवली होती. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतल्याची घोषणा केली. नाशकात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुतीकडून नाशकात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आज महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे. गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होत आहे.

हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाराजीच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केलं आहे.

  1. Eknath Shinde
  2. Nashik Lok Sabha
  3. Thane Lok Sabha
  4. Lok Sabha candidacy
  5. Indian politics
  6. Maharashtra politics
  7. Eknath Shinde statement
  8. Nashik political news
  9. Thane election news
  10. Lok Sabha elections 2024